कोरोना उपाययोजना व नियोजनासाठी संजना सावंत यांची आज रेडी मध्ये उपस्थिती

कोरोना उपाययोजना व नियोजनासाठी संजना सावंत यांची आज रेडी मध्ये उपस्थिती

तालुक्यातील रेडी परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व नियोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक ५ जुलै रोजी दुपारी २.०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणाऱ्या या बैठकीला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि येथे आरोग्य विभाग अधिकारी व स्थानिक प्रशासन यांच्यासमवेत बैठकित चर्चा करण्यात येणार आहे. तरी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा