You are currently viewing कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही…

संजु विरनोडकर टिंमची कडवी लढत चालूच…

गेले महिनाभर वादळी पावसाची तमा न करता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण व वाढत चाललेले कोवीड रुग्णाचे प्रमाण बघता रेड झोन क्षेत्रात धाडसी कोरोना प्रतिबंधक फवारणी करताना या टिमने गेल्या महिन्याभरात सुकळवाड बँक ऑफ इंडिया तळवडे बॅक ऑफ ईडिया व कोरोना बाधितांची घरे, माणगाव अपंग साह्यता केद्र मोरे, माणगाव बडोदा बॅक, पिंगुळी बॅक ऑफ ईडिया, सांगेली पंचक्रोशीत घरोघरी, कोलगाव येथील कोरोना बाधितांची घरे, कारिवडे गावकर वाडीतील प्रत्येक घरात निर्जंतुकीकरण, माजगाव नवजिवन सोसायटी व कंटेनमेंट झोन मधिल घरे , बांदा बँक ऑफ इंडिया,डिंगणे रेड झोन, दोडामार्ग बँक ऑफ इंडिया, इन्सुली क्षेत्रफळ येथे व चाराठा रेड झोन मधील घरे , व तीन जणांचा मृत्यू झालेल्या संपूर्ण गावठाण वाडीतील प्रत्येक घर निर्जंतुकीकरण करण्यात आलं सावंतवाडी शहरात बांधकाम विभाग (निर्माण भवन) बॅक ऑफ ईडिया, बँक ऑफ बडोदा, सिंडिकेट बँक, गोठण व सबनिसवाडा, सालईवाडा, पोलिस लाईन येथिल बाधितांची घरे, पंचम खेमराज महाविद्यालय या ठिकाणी गेले महीनाभर हि टिम नियोजनबद्ध कोरोना प्रतिबंधक फवारणी करून कडवी झुंझ देत आहे व सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.

यावेळी तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक बाबू कुडतरकर,ॲड परिमल नाईक, भाजपा नेते महेश सारंग, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, अँ. बापू गव्हाणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, सांगेली सरपंच रमाकांत राऊळ, माजी सभापती रवींद्र मडगावकर, नकुल पार्सेकर, चाराठा सरपंच बाळू कुबल, पोलीस पाटील सचिन परब, रामचंद्र मसुरकर, माजगाव सरपंच दिनेश सावंत, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, ग्रामसेवक  संदिप गोसावी, प्राध्यापक विवेक गोडकर, प्राध्यापक महेंद्र ठाकूर, राजेश रेडीज, बॅक ऑफ ईडीयाचे अधिकारी नंदकिशोर प्रभूदेसाई, अजित खैरे, नगरसेवक उदय नाईक, उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर,मोहिनी मडगावकर,डाॅ.कांचन विरनोडकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.

त्याच प्रमाणे या मोहिमेत गावागावातील युवकांनी सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले संजू वीरनोडकर, टीमचे संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, आकाश मराठे, सागर मळगावकर, शुभम बिद्रे, अनिकेत वाडीकर, बंटी जामदार, ज्ञानेश्वर पाटकर, अजित खैर, शुभम पारसेकर, राजवी विरनोडकर, संचिता गावडे इत्यादी कार्यकर्त्यांनी सेवाभावी मोहिमेत सहभाग घेतला व सामाजिक बांधिलकी जोपासली.

वादळी पावसामुळे काही कार्यकर्ते आजारी पडले तरीपण खंड न पडता या मोहिमेत सर्वांनी एकमेकांना सांभाळून जे यशस्वी  कार्य केले त्याबद्दल संजु विरनोडकर यांनी सर्व सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले. या टिमच्या कोरोना प्रतिबंधक निरंतर कार्याबद्दल सर्व थरातुन कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा