नगरसेवक सुधीर आडीवरेकर वाढदिवस अभिष्टचिंतन…

नगरसेवक सुधीर आडीवरेकर वाढदिवस अभिष्टचिंतन…

तरुणाईची क्रेझ असणारा सावंतवाडी नगरपालिकेतील युवा नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचा आज वाढदिवस. सुधीरचे तरुण समर्थकांचे नेटवर्क जबरदस्त आहे. तरुण मुलांची फळी त्याने आपल्या वॉर्डमध्ये उभी केली आहे त्यामुळे प्रत्येकजण त्याच्यासाठी झपाटल्यासारखा काम करतो.
सुधीरच्या वॉर्डमध्ये कोणावरही संकट आले तर सुधीर सर्वप्रथम तिथे पोचतो. स्वतःची पदरमोड करूनही तो वॉर्डातील लोकांच्या मदतीस धावतो. त्यामुळे अनेकजणांना सुधीर हा आधार असल्यासारखा वाटतो. प्रसंगाला धावून जाणारा अशीच त्याची प्रतिमा आहे.
सुधीर जे मनात असतं ते सहज बोलून जातो, छक्केपंजे करणे त्याच्या स्वभावात नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुधीरने स्वतःच्या मेहनतीवर आपलं विश्व निर्माण केलं आहे. त्याची चांगली वृत्ती आणि प्रेमळ स्वभावामुळेच लोकांनी आपला प्रतिनिधी म्हणून त्याला नगरपालिकेत पाठविले. राणे कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेल्या सुधीरला कोणी पक्ष प्रवेशाची ऑफर दिली तरी आमचे साहेब तिथे आम्ही म्हणत राणेंशी एकनिष्ठ राहतो. त्यामुळे शहरात राणे समर्थक म्हणून जी युवकांची टीम उभी राहिली ती सुधीरच्या प्रेमापोटीच. सुधीरने कधीही कॉल केला तरी युवकांची फौज उभी राहते, हीच त्यांची प्रसिद्धी. प्रसिद्धीचा त्याला कधीच हव्यास नसतो, अनेकांना मदतीचा हात पुढे करतो. त्यामुळे प्रसंगाचे भान असणारा म्हणून लोक नेहमीच त्याच्या पाठीशी असतात. आपल्या वॉर्डातील स्वच्छता आणि सुधारणांसाठी तो नेहमीच आग्रही असतो.
नगरसेवक म्हणून जनतेची सेवा हेच ब्रीद घेऊन राजकारणापेक्षा समाजकारणात विश्वास असणाऱ्या सुधीरचा आज वाढदिवस….
संवाद मिडियाकडून सुधीरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा