वेंगुर्ला
वेंगुर्ला रामघट रोड अणसुरनाका येथील ज्येष्ठ माजी सैनिक दत्ताराम विष्णू गावडे वय ( ८० ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्यामध्ये १९६२ ते १९७७ या कालावधीत देश सेवा केली. या कालावधीत १९६५ व १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते. भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागातही सेवा केली. तसेच ते लहान मुलांना व मोठ्यांना चॉकलेट नेहमी भेट म्हणून द्यायचे त्यामुळे ते चॉकलेट काका म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, पाच जावई, एक सून, चार पुतणे, एक भाऊ, तीन बहिणी, सहा नातू, एक नात असा मोठा परिवार आहे. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था संचालिका शुभांगी गावडे यांचे ते पती तर बांदा खेमराज कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका सौ. सुमेधा सुशिल सावळ व परबवाडा ग्रा. प. सदस्य तसेच बॅ.
बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक हेमंत गावडे यांचे ते वडील होत.