You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तिविकास समूह सदस्य देवेंद्र भुजबळ यांची खास निवड

जागतिक साहित्य कला व्यक्तिविकास समूह सदस्य देवेंद्र भुजबळ यांची खास निवड

महाराष्ट्रातील प्रख्यात विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या मराठी भाषा व साहित्य अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी माध्यम क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती म्हणून श्री देवेंद्र भुजबळ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.ही निवड ३ वर्षांसाठी आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने या महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान केली असून त्यानुसार हे अभ्यास मंडळ गठित करण्यात आले आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा अनिल भाबड असून मंडळाचे अन्य सदस्य प्रा डॉ राजेंद्र सांगळे, प्रा नितीन आरेकर ( कुलगुरूंचे प्रतिनिधी ) प्रा रमाकांत कराड,विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी काजळ थळे असे आहेत.

” अल्प परिचय ”
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. ते सध्या www.marathi.newsstorytoday.com
या आंतरराष्ट्रीय स्तरावरील
वेबपोर्टलचे संपादक आहेत.

श्री भुजबळ हे पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी म्हणून गेली ३५ वर्षे प्रसार माध्यमात सक्रिय आहेत.

दूरदर्शनच्या गाजलेल्या *महाचर्चा* कार्यक्रमाचे ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील *दिलखुलास* कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते.

महाराष्ट्र शासनाच्या महा न्यूज वेबपोर्टलसाठी *करिअर नामा* हे सदर त्यांनी सुरू केले . या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत. हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत. पुढे त्याचेच फलित म्हणजे २५० सरकारी अभ्यासक्रम, प्रशिक्षण यांची माहिती असलेले *”करिअरच्या नव्या दिशा”* हे त्यांचे पुस्तक होय.या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या मुली,महिलांवर त्यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी कथा *गगनभरारी* या पुस्तकात तर युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा *प्रेरणेचे प्रवासी*” या पुस्तकात समाविष्ट आहेत.

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे *”स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता*” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. पुढे याच नावाने त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित झाले. मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. देश विदेशात विविध ठिकाणी त्यांची संवाद सत्रे झाली आहेत व होत असतात. विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे .

समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते काम करत असतात.
कोरोनाच्या काळात लोकांचे मनोधैर्य
कायम राहण्यासाठी, वाढण्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून प्रयत्न केले तसेच इतरांनाही प्रेरित केले.

श्री भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. देवेंद्र भुजबळ यांचा संपर्क:
मोबाईल क्रमांक:
+91 9869484800.
इमेल: devendrabhujbal4760@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा