महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन मेळावा ग्रामपंचायत लोरे नं. १ येथिल सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कणकवली तालुक्यातील कृषी विषयक विकास होण्यासाठी सिंचनासाठी क्षेत्र वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी घोणसरी प्रकल्पाचे पोट कॅनॉल काढण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, सुजाता हळदिवे, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सहा. गट विकास अधिकारी एस. एस. हजारे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री हजारे, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष पवार, माजी सभापती तुळशीदास रावराणे, पटेल व सरपंच अजय रावराणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. माजी सभापती तुळशीदास रावराणे यांनी ह्याच मुद्यांना अनुसरून बारमाही क्षेत्र पाण्याखाली आल्याशिवाय शेती उत्पादनात वाढ होणार नाही.
यासाठी सर्व संबंधित अधिकारी व पंचायत समितीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी श्री हजारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना वीज प्रक्रिया, माती नमुने, फळबाग लागवड, कोरडवाहू शेती कृषी संजीवनी सप्ताह बाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी पंचायत समिती मार्फत फळबाग लागवड व बांबू लागवड जास्तीत जास्त करण्याचे आव्हाहन केले. यावेळी माजी सभापती श्री पटेल फोंडा विकास सोसाटीचे श्री चिक्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी सुभाष पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत वारंग यांनी केले. या कार्यक्रमास कृषी अधिकारी सतीश जाधव, विस्तार अधिकारी यशवंत लाड, सरपंच फोंडा वाघेरी सरपंच संतोष राणे, कृषी अधिकारी तोरणे, ग्रामसेविका संगीता पाटील, कृषी सहाय्यीका कानडे उपस्थित होते. त्यानंतर आधुनिक पद्धतीने भात लागवड, यांत्रिकी पद्धतीने वृक्ष लागवड कॅपटेरिया पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संयोजन विस्तार अधिकारी अभिजित मरले, सुनील पांगम, रामचंद्र शिंदे यांनी केले.