You are currently viewing मुंबई, ठाण्यातून हद्दपार झाला कणकवलीत शेठ…

मुंबई, ठाण्यातून हद्दपार झाला कणकवलीत शेठ…

बस ड्राइवर सोबत पार्टनरशीपमध्ये सुरू केला मटक्याचा बाजार.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन आश्रित झालेले कित्येकजण करोडपती झालेत परंतु त्यातील काही जण गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांतूनच गब्बर झालेत. असाच मुंबई ठाणे येथून हद्दपार झालेला एक गुन्हेगार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवलीत येऊन कणकवलीचा शेठ बनला आहे.
ठाण्यातून हद्दपार झाल्यानंतर कणकवलीत आसऱ्याला आलेल्या या गुन्हेगाराने कणकवलीतील एका बस ड्राइवरच्या सहाय्याने मटक्याचा व्यवसाय सुरू केला. दोघांनी पार्टनरशिप करून २६ जून पासून कणकवलीत कल्याण, मुंबई मटक्याचा बाजार सुरू केला. दोघे मिळून कणकवलीत बनले आहेत मटक्याचे बिटर.
मुंबई, ठाण्यातून हद्दपार झाल्यावर गैरमार्ग सोडून सुधारण्याची संधी शोधण्यापेक्षा गैरमार्गानेच पैसा मिळवून आयुष्य जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना गैरधंदे मात्र जोमात सुरू असल्याचीच ही पोच पावती आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा