राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत नील आणि पार्थ यांचे सुयश.

राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत नील आणि पार्थ यांचे सुयश.

अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई, आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत लहान गटातून पार्थ उमेश सावंत प्रथम तर मोठ्या गटातून नील नितीन बांदेकर याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
यापूर्वीही या दोघांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये नील बांदेकर राज्यात तृतीय तर पार्थ हा आठवा क्रमांक मिळवत यशस्वी झाला होता. विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा