You are currently viewing कस्पट

कस्पट

द्रोणकाव्य

आयुष्य माझं सारं
होतं फक्त तुझं
पापण्यांवर
स्वप्नातही
चाहूल
तुझी
गं

कित्येक रात्रीतली
ती अधुरी स्वप्न
मीच जपली
हृदयात
आठव
माझी
ती

तुझ्या आठवणीतून
वाहून गेलो मी
जसे वाहते
आसवांत
कस्पट
तसे
ते

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा