कुडाळ पंचायत समिती सभापतींच्या “गावभेट कार्यक्रमा”च्या समारोप प्रसंगी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे गौरवोद्गार
मागील आठ दिवस कुडाळ पंचायत समिती सभापतींचा गावभेट कार्यक्रम चालू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६८ गावांमध्ये पोहोचत शेतकरी, व्यापारी, युवावर्ग, महिला यांच्याशी गाठीभेटी घेत चर्चा करणे, त्यांना धीर देणे, विविध योजनांची माहिती देत त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी आत्मविश्वास देण्याचे काम सभापती सौ नुतन आईर आणि भाजपाच्या सर्व सहकाऱ्यांनी केले. त्याच वेळी जिल्हा परिषदेनेही अत्यंत चांगले निर्णय घेत आपला ठसा उमटवला. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांचे यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही पत्र पाठवून कौतुक केले आहे. भाजपा पंचायत समिती व जिल्हा परिषद करत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी भाजपा नेते श्री निलेश राणे आजच्या कुडाळ रांगणा तुळसुली येथील गावभेट उपक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात जातीनिशी उपस्थित राहिले. मी केवळ आपली खोटी स्तुती करत नाहीय, तर कोरोनाचे संकट असतानाही योग्य वेळी जनतेला धीर देण्यासाठी माझ्या या सहकाऱ्यांनी जे चांगले काम केले त्याचा मला अभिमान आहे. शासनाने जे काम करायला हवे होते, ते जिल्हा परिषदेने केले.
तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याला मदत आणि धीर देण्याचा राणेसाहेबांचा विचार सिंधुदुर्गात राणे साहेबांच्या जिल्हा परिषदेने सत्यात उतरवला. त्यामुळे तुम्हा सर्वांचे कौतुक करण्यासाठी मी खास येथे आलो, असे निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी शासनाचे अपयश आणि जिल्हा परिषदेचे उत्तम काम याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत,जेष्ठ नेते राजू राऊळ,जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई,सभापती श्रवणी गावकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रेश्मा सावंत,आनंद शिरवलकर,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,मोहन सावंत,कुडाळ आरोग्य अधिकारी संदेश कांबळे,कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल,विनायक राणे,युवा मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर,तालुका सरचिटणीस देवेन्द्र सामंत,विजय कांबळी,बाव सरपंच नागेश परब,विनायक अन्नावकर, योगेश घाडी ,प्रिंतेश गुरव,रांगणा तुळसुली बूथ अध्यक्ष सुभाष तुळसुलकर,तन्मय वालावकर,चंदन कांबळी,अमित तावडे,विनोद सावंत,मनोरंजन सावंत, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते