मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील पाचवा भाग प्रसारित होणार आहे. ‘कोरोना: प्लाझ्मा आणि सिरो सर्व्हेलन्स’ या विषयावरील ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर बुधवार दिनांक 16 व गुरूवार दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.
प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय, प्लाझ्मा दिल्याने काय होते तसेच प्लाझ्मा देण्यासाठी पात्रता काय ? प्लाझ्मा द्यायचा म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून घेतला जातो का ? जे लोकं अँटीबॉडी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले ते देखील प्लाझ्मा दानासाठी पात्र आहेत का ? सिरो सर्व्हेलन्स म्हणजे नेमके काय अशा महत्वाच्या मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिलखुलास’ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे