You are currently viewing सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत परबवाडा १ नंबर शाळेचे यश…

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत परबवाडा १ नंबर शाळेचे यश…

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत परबवाडा १ नंबर शाळेचे यश…

वेंगुर्ले

युवा संदेश प्रतिष्ठान कणकवली यांच्या माध्यमातून आयोजित सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परबवाडा नंबर १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. यात सांन्वी परब, राही नाईक, गार्गी परब, हर्षिता मुळीक, वैदेही पवार, प्रतिक नाईक यांनी उज्वल यश संपादन करून कांस्यपदके मिळवली आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ज्योती चव्हाण, विशाल जाधव, आरती गवंडे, मयुरी नंदगडकर व मुख्याध्यापक रामचंद्र झोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच विष्णू परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब, उपाध्यक्ष सहदेव परब, पालक शिक्षक उपाध्यक्षा संजना मुळीक, माता पालक उपाध्यक्षा स्वरा देसाई आदींनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा