मनसेत इन्कमिंग सुरूच..

मनसेत इन्कमिंग सुरूच..

साळगाव येथील युवकांचा मनसेत प्रवेश..

सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे हस्ते युवकांनी हाती घेतला मनसेचा झेंडा..

आज दि.२८ जून २०२१ रोजी कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील असंख्य युवकांनी विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर,सूचित परब,दिपक गुराम यांच्या माध्यमातून मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,जिल्हा सचिव बाळा पावसकर,तालुका सचिव राजेश टंगसाळी,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर,उपविभाग अध्यक्ष सुंदर गावडे,सर्वेश राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूरज घाटकर,संदेश कर्पे,सचिन सावंत,जुजे फर्नांडिस, राहुल साळगावकर, आगस्तीन फर्नांडिस,अंकुश उमळकर,शिवाजी परब, ऋग्वेद मेस्त्री,बलराम मोरे, सुधीर कोरगावकर यांसह असंख्य युवकानी मनसेचा झेंडा हाती घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा