जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची माहिती
ओरोस
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व ग्रामपंचायत साळगांव यांचे संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषिदिन कार्यक्रम १ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद कृषी समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यानी दिली आहे. कृषि मेळावा उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रम अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत असणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती खा नारायण राणे, खा. विनायक राऊत, आ. बाळाराम पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, आ. दिपक केसरकर,आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,सभापती, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, कुडाळ सभापती नुतन आईर, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, साळगाव सरपंच उमेश धुरी सरपंच, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुधीर चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस एन म्हेत्रे आदीची उपस्थिती आहे.
हा कार्यक्रम कोरोनाबाबत सोशल डिस्टनचे पालन करुन आयोजित करण्यात येणार आहे. कै. वसंतरावजी नाईक यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कृषि क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या शेतक-यांचा सत्कार व म. गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत व बायोगॅस योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामसेवक यांचा सत्कार, वृक्षारोपण, हळद लागवड प्रात्यक्षिक श्री (SRI)पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक इत्यादि कार्यक्रम संपन्न होणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण यांनी केले आहे.