ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश
वैभववाडी
ग्रामपंचायत सडुरे शिराळेचे सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाच्या जोरावर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ प्रभाग स्पर्धेत श्री नवलराज काळे कार्यरत असलेल्या प्रभाग क्रमांक एक (समाविष्ट वाड्या मेजारीवाडी, रावराणेवाडी, बौद्धवाडी, तुळशीचे भरड,राणेवाडी) या प्रभागाणे प्रभाग स्तरीय स्वच्छता अभियान मूल्यांकन स्पर्धेत प्रथम क्रमांक रक्कम रुपये दहा हजार चे बक्षीस प्राप्त केले . यासाठी नवलराज काळे यांना त्यांचे सहकारी सदस्या आकांक्षा जंगम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रभागांमधील ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन स्वच्छ प्रभाग या स्पर्धेत प्रभागाला एक नंबर मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यशस्वी ठरले . मिळालेला बक्षीसरुपी दहा हजार रुपये निधीतून प्रभागातील प्रत्येक कुटुंबियांना स्वच्छतेचा भाग असलेली कचराकुंडी वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाचा शुभारंभ 18 जून 2021 रोजी ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्या आकांशा जंगम, ग्रामसेवक प्रशांत जाधव, तलाठी अक्षय लोणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय जंगम, रवळनाथ सोसायटीचे व्हाईस चेअरमन दीपक भावे, संचालक संभाजी काका रावराणे, संचालक उदय रहाटे, संचालिका सुलोचना डांगे,मालती रावराणे, अजित जंगम, योगेश जंगम, संचित जंगम, सुनील राऊत, अशोक पाटील, रमेश जंगम, अमित सकपाळ भिकाजी जंगम, आदी उपस्थित होते.
सदर कचराकुंडी वाटपाचा कार्यक्रम कोरोना सनियंत्रण समितीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे त्यांच्यासोबत सनियंत्रण समितीचे सदस्य अजित जंगम,संजय जंगम, योगेश जंगम,संचित जंगम यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोणा संदर्भातील सर्व नियमाचे पालन करून कचरा कुंडीचे वाटप केले.
ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधील जनते कडून ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचे प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वच्छता अभियानांतर्गत बक्षीस प्राप्त करून बक्षीस स्वरूपी मिळालेली रक्कम प्रभागातील जनतेपर्यंत कचराकुंडी वाटप उपक्रमाद्वारे पोचवल्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रभाग ला बक्षीस प्राप्त करून त्या बक्षिसाची अंमलबजावणी करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत सडुरे शिराळे ठरली आहे. या उपकरणामुळे या ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.