सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या लसीकरण सत्रासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर एकूण 7 हजार 780 कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
यावेळी दुसऱ्या डोससाठी पात्र लाभार्थ्यांचे (ज्यांना पहिला डोस घेतलल्यावर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत.) प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील नोंदणीची सोय उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील 18 ते 44 वर्षे वयोगातील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
सदर लसीकरण सत्र पुढील प्रमाणे आहे. तालुका, प्राथमिक आरोग्य केद्र अंतर्गत उपकेंद्र व उपलब्ध लसी यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. वैभववाडी तालुक्यातील – वैभववाडी – 100, सडुरे – 80, लोरे 2 – 80, उंबर्डे- 80, भुईबावडा – 80, ग्रामीण रुग्णालय वैभववाडी- 0, कणकवली तालुक्यातील- खारेपाटण – 0, नडगिवे – 80, शिडवणे – 80, कासार्डे-80, साटमवाडी- 80, कनेडी- 0, सांगवे- 80, दिगवळे- 80, फोंडा-0, लोरे 1 – 80, हरकुळ खु.- 80, कळसूली- 0, ओसरगाव- 80, शिवडाव-80, वरवडे-0, कलमठ- 80, कासरल- 80, नांदगाव-0, हुमरठ- 80, तरंदळे- 80, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली- 160, देवगड तालुक्यातील- पडेल- 80, गिरये- 80, मोंड-0, मुटाट- 80, नाडण- 80, फणसगाव-80, धालवली- 80, मिठबांव- 0, हिंदाळे- 80, नारिंग्रे-80, इलियाळे- 80, जामसंडे- 80, शिरगांव- 0, कुवाळे- 80, वाळीवंडे-80, उपजिल्हा रुग्णालय, देवगड- 160, मालवण तालुक्यातील- आचरा- 0, बांदिवडे- 80, तोंडवळी-80, मसुरे- 0, कांदळगाव-80, हडी- 80, चौके-0, अंबेरी-80, कुणकवळे- 80, गोळवण-0, पेंडूर-80, वराड- 80, हिवाळे-0, हेदूळ-80, शिरवंडे- 80, ग्रामीण रुग्णालय, पेंडूर कट्टा-160, ग्रामीण रुग्णालय, मालवण -160, कुडाळ तालुक्यातील- कडावल-0, कुपवडे-80, घोडगे-80, कसाल-0, हुमरमळा-80, आंब्रड-80, पेंडूर-0, वाडी वरवडे-80, पिंगुळी-80, हिर्लोक-0, पावशी-80, घावनळे-80, माणगाव-0, गोठोस-80, आकेरी- 80, वालावल-0, तेंडोळी-80, पाट-80, ग्रामीण रुग्णालय,कुडाळ-160, जिल्हा रुग्णालय -160, वेंगुर्ला तालुक्यातील –परुळे-0, कर्ली-80, केळूस-80, आडेली-0, वेतोरे-80, दाभोळी-80, तुळस-0, उभादांडा 1- 80, आसोली-80, रेडी-0, कनायाळ-80, केरवाडा-80, ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला- 160, उप जिल्हा रुग्णालय, शिरोडा-160, सावंतवाडी तालुक्यातील – मळेवाड-0, न्हावेली-80, आरोंदा-80, सांगेली- 0, कारीवडे-80, शिरशिंगे-80, निरवडे-0, ओटवणे-80, तळवडे-80, आंबोली-0, चौकुळ-80, माडखोल-80, बांदा-0, मडुरा-80, शिरीये-80, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी-160, दोडामार्ग तालुक्यातील- भेडशी-0, पिकुळे-80, वायांगताड स्कूल-80, मोरगाव-80, मनेरी-80, तळकट-0, खोनाशी-80, झोंळबे-80, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग- 160 या प्रमाणे एकूण 7 हजार 780 लसी उपलब्ध असणार आहेत.