सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रा.सुभाष गोवेकर यांच्याकडून दहा हजार रुपयांचा धनादेश.
डॉक्टर संसारे यांच्याकडून आश्रमातील निराधार वृद्ध व्यक्तींना तीन हजार रुपये किमतीचे डायपर किट प्राप्त.
सावंतवाडी
शहर आणि गावांमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात निराधार वृद्धांसाठी जीवन आवश्यक वस्तू,आश्रमांसाठी मदत कार्य, शैक्षणिक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना मदत, व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असलेल्या युवकांना व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य, आरोग्य शिबिर राबवणे, गोरगरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मदत,आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णांना मदत, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम,व्यसनमुक्ती कार्यक्रम,तसेच विविध सामाजिक उपक्रम संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक बागवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात आणि याच सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन समाजामधील अनेक दाते या संस्थेच्या सेवाभावी उपक्रमांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत केलेले मदत कार्य योग्य व गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणारच हा त्यांचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान वरचा एक विश्वास आहे.
प्रा. सुभाष गोवेकर हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची नेहमीच दखल घेत असतात आणि आपल्याकडून या संस्थेला एक मदतीचा हात म्हणून या संस्थेला त्यांनी दहा हजार रुपयेचा चेक देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच डॉक्टर संसारे यांनी तीन हजार रुपये किमतीचे आश्रम मध्ये असलेल्या निराधारान करिता डायपर किट दिले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी या दोन्ही दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.