सावंतवाडी डेपोतून उद्यापासुन लांब पल्ल्याच्या व स्थानिक एसटी फेऱ्या सुरु
आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती
सावंतवाडी
सावंतवाडी आगार मधून दिनांक २८ जुन २०२१ पासून लांब पल्ल्यांच्या आणि सावंतवाडीतील जवळच्या एस. टी. बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या सावंतवाडी ते पुणे (आंबोली मार्गे ) सकाळी ७:१५ वाजता, सावंतवाडी ते तुळजापूर (आंबोली मार्गे) सकाळी ९ वाजता, सावंतवाडी ते पुणे निगडी ( शिवशाही) सायंकाळी ६:४५ वाजता, सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे सकाळी १०:३० वाजता, सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे दुपारी १:४५ वाजता, सावंतवाडी ते रत्नागिरी सकाळीं ७:३०, १०:०० आणि दुपारी १:०० वाजता अशा गाड्या सुरू करण्यात येणार आहे.
तर जवळच्या बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी ते दोडामार्ग सकाळी ७:१५, ९:००, दुपारी १२:३०, सायंकाळी ५:००, सावंतवाडी ते शिरोडा सकाळी ७:००, ८:००, दुपारी १:३०, सायंकाळी ५:००, सावंतवाडी ते शिरशिंगे गोठवेवाडी ८:००, दुपारी १:००, सावंतवाडी ते पारपोली सकाळी ८:००, दुपारी १२:००, ३:००, सावंतवाडी ते शिवापुर सकाळी ७:३०, दुपारी १:३०, सावंतवाडी ते कालिका मंदिर सकाळी ९:३०, दुपारी १२:०० अशा गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे.