व्यवसाय बंद करायचा तर पुढे कुटुंबाचे काय करायचे?

व्यवसाय बंद करायचा तर पुढे कुटुंबाचे काय करायचे?

व्यापाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे

सावंतवाडी :

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी व व्यावसायिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्यातून काही विशेष उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी सावंतवाडी तालुका व्यापारी व उद्योजक, व्यावसायिक संघाच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

लॉकडाऊन मुळे बरेच व्यवसाय बंद झाले तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हॉटेल व्यावसायिकांच्या समोर तर अनेक अडचणी आहेत. व्यवसाय बंद करायचा तर पुढे कुटुंबाचे काय करायचे ? त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही.

 

व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा कोणाला सांगायाच्या ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्गातील सर्व व्यापारी व्यावसायिकांच्या व्यथा मुख्यमंत्र्याकडे मांडण्याची जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाची मुख्यमंत्री यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भेट घडवून आणावी.

 

व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जी मदत लागेल ते करण्याची तयारी शासनाने दाखवावी. व्यापारी हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचाही सहानुभूती पूर्वक विचार केला जावा. व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. कोरोना कालावधीत व्यापारी वर्गासाठी लसीकरणाचा राखीव कोटा ठेवण्यात यावा. अशा विविध मागण्या पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. ना. सामंत, खा. राऊत यांनी व्यापारी बांधवांच्या भावना जाणून घेतल्या.  आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे व्यापारी बांधवासाठी केले जाईल. तसेच लाईट बिलासंदर्भात लवकरच मीटिंग लावून तोडगा काढू. व्यापारी बांधवांसाठी लसीकरण देण्याचेही त्यांनी मान्य केले. यावेळी संदेश पारकर, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जितेंद्र पंडित, महेश कुमठेकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, उपाध्यक्ष सुमंगल कालेकर, अभय पंडित, वल्लभ नेवगी, संदेश परब, राजू भालेकर, डी के सावंत, उदय नाईक, संतोष कुलकर्णी, लाड परवेश सय्यद, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा