You are currently viewing कुडाळमध्ये‌ ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन

कुडाळमध्ये‌ ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड

कुडाळ :

कुडाळमध्ये आज भाजपच्या वतीने ओबीसी राजकिय आरक्षण संदर्भात मुबंई गोवा महामार्गावर कुडाळ येथे माजी खा. निलेश राणे आणि आम.नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय.

यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आलीय. तर आंदोलन स्थळी काही भाजप कार्यकर्त्यांकडून टायर हायवेवर जाळण्याचा प्रयत्न करताना भाजप कार्यकर्त्यांनां पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतू लगेच कार्यकर्त्यांना सोडून दिले.

निलेश राणे म्हणले की, ठाकरे सरकार झोपेचं सोग करतंय तर मंत्री वेगवेगळ्या मस्तीत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुबंई किंवा पुण्याच्या बाहेर दिसत नाही. मस्ती करण्यासाठी आपआपले जिल्हे वाटून घेतले आहे. त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्रचे कोणते विषय सुटतील अशी अपेक्षा नाही.

15महिने सरकार झोपलं होत 15महिने कोर्ट थांबून पुरावे ठाकरे सरकार देऊ शकल नाही. त्यामुळे ठाकरे सरकार गोधलंच घडवायचा होता. सरकारला मराठा आरक्षण मध्ये रस नाही तर ओबीसी राजकिय आरक्षण टिकविण्यामध्ये रस नाही. फक्त गोधलंच घालत बसा अशी खोचक टीका राणे यांनी केलीय.

विजय वडेट्टीवार यांचा सुद्धा निलेश राणे यांनी समाचार घेतलाय. मंत्री विजय वडेट्टीवार यांना कॅबिनेटमध्ये आणि मंत्रालयमध्ये सुद्धा काडीची किंमत नाही, एवढं लक्षात ठेवा. कॅबिनेटमध्ये ज्या मंत्र्यांची धमक नाही. त्यांनी मीडिया समोर बोलून पोपटपंची करू नये. खरंच समाजासाठी लढा उभा करायचा असेल तर राजीनामा द्या आणि बाहेर या ठाकरे सरकारला तुमचा किती विरोध आहे ते दाखवा. ठाकरे सरकारमुळे आरक्षणाचा मुद्दा गुंतागुंतीचा झालेला आहे. वडेट्टीवार यांनी नुसती पोपटपंची करू नये. खरोखरच ओबीसी समाजाचा कळवळा असेल तर राजीनामा द्या आणि बाहेर या असा सवाल राणे यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारने सामाजिक घडी विसकटली असल्याचा आरोप आम.नितेश राणे यांनी‌ केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा