सावंतवाडी व्यापारी संघटना ; व्यापार्यांचे लसीकरण करा, पालकमंत्र्यांसह खासदारांकडे मागणी…
सावंतवाडी
कोरोनाच्या काळात दुकाने बंद असल्यामुळे व्यापार्यांचे कबंरडे मोडले आहे. त्यामुळे विजेच्या बिलात सवलत देण्याबरोबर बिलात लावले जाणारे उपकर माफ करण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी व्यापारी संघटनेच्यावतीने आज पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान संसर्गाच्या काळात जीवावर उदार होवून व्यापारी बांधव सेवा देत आहेत.त्यामुळे त्यांचे लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न व्हावेत,अशी ही मागणी त्यांनी केली. हॉटेल व्यावसायिक अडचणीत आहे.त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावा,असे त्यांनी म्हटले. आज व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आकेरी विश्रामगृहावर जावून त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदिश मांजरेकर,पुंडलिक दळवी,बाळ बोर्डेकर,वल्लभ नेवगी,अभय पंडीत,संदेश परब,जितेंद्र पंडीत,महेश कुमठेकर,राजू भालेकर,संतोष कुलकर्णी,डी.के.सावंत परवेझ सय्यद,उदय नाईक,सुमंगल कालेलकर आदी उपस्थित होते.