You are currently viewing दरडी हटवल्याने कोकण रेल्वे मार्ग निर्धोक

दरडी हटवल्याने कोकण रेल्वे मार्ग निर्धोक

कणकवली :

स्वप्न नवे सत्य म्हणून पण प्रत्यक्षात साकारलेला सुमारे ७०० किमी लांबीचा कोकण रेल्वे मार्ग आता निर्धोक झाला आहे. सुरुवातीला या मार्गाच्या दोन्ही बाजूने यु पोर्शनमध्ये दरडीचे कटिंग करण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात वारंवार या दरडी कोसळून मार्ग ठप्प होत होता. यासाठी गेल्या ७ ते ८ वर्षांमध्ये या सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून माती काम करत दरडी व्ही पोर्शनमध्ये कटिंग करण्यात आल्या. त्या मार्गावरील दरडीचा धोका जवळपास पूर्ण झाला आहे.

गेल्या पाच वर्षात पावसाळ्यात कुठे या मार्गावर दरड कोसळण्याची मोठी घटना घडलेली नाही. तरीही पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सतर्क सुमारे ६०० कामगारांची ट्रॅकवर २४ तास गस्त घातली जात आहे. २५ वर्षापूर्वी मुंबई आणि कोकण यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग होता. मात्र कोकण रेल्वे सुरू झाले आणि खर्‍या अर्थाने मुंबई आणि कोकणामधील अंतर कमी झाले.

अवघ्या ८ ते १० तासात मुंबई ते कोकण प्रवास असल्याने त्यांची पहिली पसंती कोकण रेल्वे प्रवासाला असते. कोकण रेल्वेमुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण कमी झाला. तसेच दूर सेवेमुळे अवजड वाहतूक कमी झाली. कोकणच्या डोंगरदऱ्यातून जाणारा हा मार्ग अनेक दिव्य पार करून साकारण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा