किती ऐकवली जना,
ती पोकळ आश्वासने.
मना नाही ती लाज,
खोटं सहजच बोलणे.
पेट्रोल, डिझेल, गॅस,
म्हणे सबसिडी देऊ.
बाजारभाव ते पाहूनी,
आता आले नाकीनऊ.
अन्नधान्य महागाईच,
जणू पाचवीला पुजली.
कोणी येवो सत्तेत सारे,
एका माळेतच ओवली.
दोन हजार शेतकऱ्या,
किती महाग पडती.
खतांच्या या किंमती,
हल्ली रोजच वाढती.
दिनरात आरोग्याची,
चिंता मनाला सतावी.
औषधांचा दर केव्हाच,
हात आभाळास लावी.
धनदांडगे ते पोसले,
ओझ्याने गरीब चेपले.
दोनवेळच्या घासासाठी,
उन्हातान्हात पोळले.
संत सांगोनीया गेले,
चांगले दिवस येतील.
कालचे बरे होते असे,
पुढे लोकच म्हणतील.
(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६