You are currently viewing कुडाळ तालुक्यातील मौजे  ओरोस येथे 13 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

कुडाळ तालुक्यातील मौजे  ओरोस येथे 13 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी :

कुडाळ  तालुक्यातील मौजे ओरोस, खर्येवाडी, जैतापकर कॉलनी, घर नं. 660 च्या 50 मीटर परिघारमध्ये दिनांक 19 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, बामणवाडी, घर नं. 1557 च्या 50 मीटर परिघारमध्ये दिनांक 19 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस,गणेशनगर, दीक्षांत अपार्टमेंट (नविन पोलीस वसाहत) A विंग, रुम.न.204 दिनांक 19 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, पोलीस अधिकारी वसाहत, रुम. नं. 201 दिनांक 19 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, नवनगर विकास प्राधिकारण ज्ञानसागर इमारत, रुम. नं. 207 दिनांक 22 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस पोलीस वसाहत, इमारत क्र.7 दिनांक 22 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस पोलीस वसाहत A विंग, रुम नं. 104, दिनांक 22  सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, नवनगर, विकास प्राधिकारण, माई निवास, घर नं. 121, दिनांक 23 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, नवनगर विकास प्राधिकरण, प्लॉट नं AB-28 दिनांक 24 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, सावंतवाडा, च्या 50 मीटर परिघारमध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, देऊळवाडी, घर नं. 198 व घर नं. 527  च्या 50 मीटर परिघारमध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2020 पर्यंत, ओरोस, वरची परबवाडी, घर नं 508 व ओरोस देऊळवाडी 198 घर नं. 527  च्या 50 मीटर परिघारमध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2020 पर्यंत, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकापर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =