You are currently viewing फोंडाघाट PHC (प्राथमिक आरोग्य केंद्रात) अनागोंदी कारभार – अजित नाडकर्णी

फोंडाघाट PHC (प्राथमिक आरोग्य केंद्रात) अनागोंदी कारभार – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

फोंडाघाट आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार आज निदर्शनास आला. केंद्रीय आरोग्य विभागाने 18/ 45 च्या कोविड बाबतीत ऑफलाइन जो प्रथम येईल त्यास लस हा निर्णय बासनात बांधला आहे. त्यात लसीचा पुरवठाही कमी होतो. यात मेडिकल ऑफिसरला या सर्व लोकांना तोंड द्यावे लागत आहे. याचा दोष कोणाला द्यायचा? DHO / सीईओ की सिंधूदुर्ग जिल्हाधिकारी की पालकमंत्री. हा सर्व विषय तेरी भी चूप मेरी भी चुप असा सुरू आहे.

हे सर्व फोंडाघाट आरोग्य केंद्राला भूषणावह नाही. या सर्व नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. नाहीतर कोविड लस प्रायव्हेट करावी. लस घेणाऱ्यांची होणारी परवड मी स्वतः पाहिली आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री यांची भेट घेणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eight =