ऑनलाईन नोंद केलेल्या नागरिकांना लस न मिळाल्याने मनसेच्या उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांना संपर्क
आरोग्य विभागच्या माध्यमातून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी ऑनलाईन वेळ निश्चित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होता.
ऑनलाईन पद्धतीने निश्चित केलेल्या वेळेत व तालुक्यातील किंवा नजीकच्या ठरवून दिलेल्या आरोग्य केंद्रात या पूर्वी देखील तालुक्यातील अनेक लोकांनी आज पर्यंत लसीकरण करून घेतले. आजच्या दिवशी नरडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ दिसून आला.
ऑनलाईन पद्धतीने लसीकरण करण्यासाठी 3 ते 5 या वेळेत नोंद केलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
या बाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना कोणतीच कल्पना नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क करून विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितलं. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करीत असुन यापुढे अशा पद्धतीने कामकाज निदर्शनास आल्यास मनसे आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारबाबत आंदोलन उभारेल.