You are currently viewing मत्स्य संपदा योजने अंतर्गत कोकणात मत्स्य शेती आदी प्रकल्प राबविण्यात यावे

मत्स्य संपदा योजने अंतर्गत कोकणात मत्स्य शेती आदी प्रकल्प राबविण्यात यावे

संग्राम प्रभुगावकर यांची मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

वेंगुर्ले :

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी मत्स्य संपदा योजना सुरु करण्यात आली असून खऱ्या अर्थाने ही योजना सर्वसामान्यांसाठी व रोजगार निर्मितीसाठी राबवायची असेल तर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अमलात आणणे आवश्यक आहे. मत्स्य संपदा योजने अंतर्गत कोकणात मत्स्य शेती, कोलंबी बीज निर्मिती, खेकडा उत्पादन आदी प्रकल्प राबविण्यात यावेत. या योजनेत रोजगार निर्मिती होऊ शकणाऱ्या गोष्टींवरती आर्थिल तरतूद करून मत्स्य संपदा योजना सक्षमपणे राबविण्यात यावी, अशी मागणी माजी जि.प अध्यक्ष, मत्स्य संपदा योजनेचे कमिटी व क्रिएटिव्ह युथ फोरमचे अध्यक्ष सदस्य संग्राम प्रभुगावकर यांनी मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून किनाऱ्या लगत सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्र हे खाजण क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी साधारण १४ हजार हेक्टर क्षेत्र हे मत्स्य शेती व कोलंबी उत्पादना करीता उपलब्ध होऊ शकते. कोकणात कोलंबी बीजांचा पुरवठा करणारे एकही बीज उत्पादन केंद्र हॅचरी उपलब्ध नाही. त्यामुळे परराज्यातून बीज आणावे लागते. हे लक्षात घेऊन मत्स्य संपदा योजने अंतर्गत कोकणात कोलंबी बीच निर्मिती केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ व NPEDA यांनी निश्चित केलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळाघर येथील शासनाच्या जागेत हे केंद्र सुरू करावे, अशी मागणी संग्राम प्रभुगावकर यांनी केली आहे. तसेच केंद्रीय समुद्र मत्स्य संशोधन संस्था कोचीन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार वेंगुर्ला उभादांडा येथील शासनाच्या जागेत मत्स्य बीच केंद्र उभारावे, यातून रोजगार निर्मिती होईल, असेही प्रभुगावकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा