सिंधुदुर्गनगरी
उपविभागांतर्गत असणाऱ्या लघु पाटबंधारे योजना शिवडाव या धरणाची पाणी पातळी आज दिनांक 21 जून 2021 रोजी तलांक 118.50 मी झाली असून पुढील 2 ते 4 दिवसात सांडव्यावरुन विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नदी, नालाप्रात्रातील पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी, नाल्याकाठच्या लोकांना इशारा देण्यास येतो की नदीपात्रात,नाल्यास उतरु नये व सावधानता बाळगावी. नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क रहावे असे उपविभागीय अभियंता पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्र.1 कणकवली यांनी कळविले आहे.