You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व सोयींनीयुक्त विलगिकरण कक्ष.

सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व सोयींनीयुक्त विलगिकरण कक्ष.

जि.प. सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते शुभारंभ.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गृह विलगिकरण बंद करण्यात आले असल्याने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी गाव पातळीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी विलगिकरण कक्ष स्थापन करण्याचे सांगितले आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव गावागावात दिसून येत असून काळजी न घेतल्याने अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. नागरिकांकडून कोरोना बाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णसंख्या विलक्षण वाढलेली आहे.कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्णास विलगिकरणात ठेवणे गरजेचे असल्याने सावंतवाडी तालुक्यातीलआरोस गावात केंद्रशाळा आरोस गिरोबा, येथे सर्व सोयींनीयुक्त असा विलगिकरण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. या विलगिकरण कक्षाचे उद्घाटन जि.प. सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोस गावचे सरपंच श्री शंकर नाईक व इतर सदस्य गावात उत्तम कार्य करत असून विलगिकरण कक्षात रुग्णांना मनोरंजनासाठी त्यांनी टीव्ही, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आठ बेड असणारा विलगिकरण कक्ष उभारला असून गरज भासल्यास १५ बेडची सुविधा करण्याची तयारी ठेवली आहे. जि.प. सदस्य राजन मुळीक यांनी या विलगिकरण कक्षासाठी १००००/- रुपयांचा धनादेश सरपंचांकडे सुपूर्द केला तर गावातील सामाजिक कार्यकर्ते अमर घोगळे यांनी २ ऑक्सिजन कंटेनर दिले. सरपंच शंकर नाईक यांनी यावेळी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देताना हा विलगिकरण कक्ष ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केल्याचे सांगितले तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. जि प सदस्य राजन मुळीक यांनी सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसांची माहिती देत, आपला गाव कोरोनामुक्त कसा राहील यासाठी गावाने एकत्रित प्रयत्न करावा असे आवाहन केले.


कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी केली तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक लेम सरांनी केलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, विश्वजित करंगुटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश नाईक, पोलीसपाटील महेश आरोस्कर, राजन नाईक, विजय नाईक, शैलेश नाबर, प्रानेश नाईक, भाई रेडकर, रविंद्र नाईक, आरोग्य सेवक राठोड, अंगणवाडी सेविका, गाव कोरोना नियंत्रण समिती, कृती समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा