You are currently viewing कलमठ गावचे सुपुत्र डॉ. विश्वास कोरगावकर यांचं आज निधन..

कलमठ गावचे सुपुत्र डॉ. विश्वास कोरगावकर यांचं आज निधन..

कणकवली :

कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र डॉ. विश्वास उर्फ बबन आपा कोरगावकर यांचे आज कोल्हापूर येथे उपचरादरम्यान सकाळी ६.३० वा निधन झाले आहे. त्यांचे वय वर्षे ६६ होते. शांत मनमिळावू व हसतमुख असणाऱ्या डॉक्टर कोरगावकर यांनी नेहमीच आपल्या आयुष्यात रुग्णांची सेवा केली.

नांदगाव व कलमठ या गावी त्यांनी ३० ते ३५ वर्षे रुग्णांची सेवा केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने कलमठ गावात हळहळ व्यक्त होत आहे. कलमठ गावतील डॉ. वैशाली कोरगावकर यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना व नातवंड असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा