You are currently viewing मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावर टिका करणारे शिवसेनेत आलेले ‘उपरे’च – अमित इब्रामपूरकर

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावर टिका करणारे शिवसेनेत आलेले ‘उपरे’च – अमित इब्रामपूरकर

कोरोनाच्या निधीवर डल्ला मारणारेच स्वत:चा पेट्रोल पंप असताना दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावर जाऊन पैशाची पाकीटे वाटत आहेत – मनसेचा हल्लाबोल

आमदार वैभव नाईक शिवसेनेत ‘उपरे’ आणि मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावर टिका करणारेही शिवसेनेत ‘उपरे’ असा घणाघाती पलटवार मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी शिवसेना पावशी विभागप्रमुख आंगणे यांच्यावर केला आहे.शिवसेनेचे निष्ठवान शिवसैनिक उपरकारांवर टीका करणार नाहीत कारण जिल्ह्यात दहशत असताना स्वताच्या जीवाची पर्वा न करता शिवसैनिकांसाठी लढणारे उपरकर निष्ठावान शिवसैनिकांना माहीत आहेत.त्यावेळी वैभव नाईक कोंग्रेसमध्ये होते. आणि मार खाणार्‍या शिवसैनिकांचे हाल पाहत होते.उपरकर त्यावेळी लढले म्हणून तुम्हाला हे दिवस दिसले.म्हणूनच उपर्‍या असणार्‍या आमदारांना उपर्‍या कार्यकर्त्या आडून टीका करावी लागत आहे.

इब्रामपूरकर पत्रकात पुढे म्हणतात उपरकर मनसेत उपरे नाहीत.राज ठाकरे यांच्या सोबतच होते.आमदार असताना तांत्रिक बाबींमुळे शिवसेनेत राहावे लागले. याबाबत विधानसभा २०१४ सावंतवाडीच्या जाहीर प्रचार सभेत राज ठाकरेंनीच उपरकर शरीराने शिवसेनेत होता पण मनाने माझ्याकडेच होता असे वक्तव्य केले होते.त्यामुळे मनसेत उपरकरांना कोणी उपरे बोलू नये.मनसे सेटलमेंट करणारा पक्ष नाही याउलट करोना काळामध्ये आलेल्या शासकीय निधीचा गैरवापर आमदार खासदार पालकमंत्री करत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांमार्फत कामे घेऊन प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार जिल्ह्यात होत आहे.यासारख्या अन्य भ्रष्टाचाराचीही प्रकरणे मनसे जनतेसमोर पुराव्यानिशी पोलखोल करत आहे.म्हणुनच वैफल्यग्रस्त ‘उपरे’ आमदार वैभव नाईक हे आपल्या उपऱ्या कार्यकर्त्यां आडून मनसे नेते परशुराम उपरकर टीका करत आहेत.परशुराम उपरकर यांच्यावर टिका करणाऱ्या या उपऱ्या कार्यकर्त्यांने राणेसमर्थक असताना निवडाणुकीवेळी शिवसेनेच्या टेबलावर लाथ मारली होती.त्याने मनसे नेत्यांना पक्षनिष्ठा शिकवू नये.

भ्रष्टाचाराची पोलखोल मनसे करत असल्याने व जिल्ह्यात चाललेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची बनवाबनवी मनसे जनतेसमोर आणत असल्यामुळे सेनेचे कार्यकर्ते मनसेवर टीका करत आहेत.

शासकीय निधीवर डल्ला मारणाऱ्यांनी दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावर जाऊन पाकीटे वाटण्यापेक्षा स्वतःच्या कणकवलीतील पेट्रोल पंपावर दिवसभर लोकांना मोफत पेट्रोल दिले असते तर लोकांनी आशीर्वाद दिले असते.

वाद सर्वच पक्षात असतात तसे मनसेतही आहेत.कामांच्या चढाओढीवरुन असतीलही.पण तुमच्या शिवसेना पक्षात पैशाच्या देण्या-घेण्यावरून जसे आहेत तसे वाद मनसेत नाहीत.आमदार असलेल्या केसरकर यांचे खासदारां सोबत पटत नाही. पालकमंत्र्यांसोबत पटत नाहीत हे त्यांनी अलीकडेच केलेल्या विधानांवरून स्पष्ट होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकांच्या मनामनात आहेत.आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनंतर आशेचा किरण म्हणुन जनता राज ठाकरेंकडे पाहते.बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ठाकरे ब्रँड म्हणजेच राज ठाकरे हेच समीकरण आज महाराष्ट्रात आहे.त्यामुळे अश्या उपर्‍या लोकांच्या विधानाला मनसे किंमत देत नसल्याचेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा