You are currently viewing देवगड तालुक्यात आज भाजपचे कडक आंदोलन

देवगड तालुक्यात आज भाजपचे कडक आंदोलन

“सिंधुदूर्ग जिल्हा रेड झोनमध्ये, पालकमंत्री सेफ झोनमध्ये” घोषणा देत पालकमंत्र्यांचा निषेध..

देवगड :

आरोग्य यंत्रणेवर सरकारने  कोरोना कालावधीत लक्ष केंद्रित न केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आज लक्षवेधी कडक आंदोलन करण्यात आले. देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील देवगड ग्रामीण रुग्णालय समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच “सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये पालकमंत्री सेफ झोनमध्ये” अशा घोषणा देत पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.

सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या देवगड तालुक्यात वाढत आहे. या कोरोना कालावधीत शासनाने आरोग्य यंत्रणेने कडे लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते. परंतु या तीनचाकी महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी घोषणे पलिकडे काहीही केलेले नाही. आठ दिवसात ऑक्सिजन प्लांट देवगड मध्ये उभा करु, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मात्र दोन महिने पूर्ण झाले तरी अद्याप ऑक्सीजन प्लांट तर सोडाच देवगड तालुक्यात आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागा देखील भरण्यात आलेल्या नाहीत. याच्याच निषेधार्थ देवगड तालुका भाजपच्या वतीने आरोग्य विभागाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, बाळा खडपे, नगराध्यक्षा सौ प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, शिक्षण व आरोग्य सभापती संजय तारकर, नगरसेवक योगेश चांदोसकर, सुभाष धुरी, नगरसेविका प्राजक्ता घाडी आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा