You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट

सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 9.06 टक्के असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी 55.20 टक्के इतकी असून महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट आहे. जिल्ह्याकरिता दि. 21 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजलेपासून दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे सुधारीत आदेश लागू केले आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.

            या आदेशात म्हटले आहे, अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने आस्थापना –  सर्व दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना – सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह – बंद राहतील. रेस्टॉरंट्स  – सोमवार ते शुक्रवार  सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 % आसन क्षमतेुनसार डायनिंग सुरू राहिल. सायंकाळी 04.00 नंतर पार्सल सेवा चालू राहील व शनिवार आणि रविवार फक्‍त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग – दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत. खाजगी आस्थापना / कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी  04.00 वाजेपर्यंत. दिनांक 04 जून, 2021 च्‍या निर्देशानुसार वगळण्‍यात आलेल्‍या सर्व आस्‍थापना जसे खाजगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था व गैर बॅंकीग वित्‍त संस्‍था इ. कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील. कार्यालयीन उपस्थिती – शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये)- 50% उपस्थितीसह सुरु राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्‍थापना, मान्‍सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा / कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. खेळ – बाहेर मोकळ्या जागेत (Outdoor) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत. चित्रीकरण- सुरक्षित आवरणामध्‍ये (Bubble) सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत मुभा. सायंकाळी 05.00 वाजलेनंतर कुठेही वावरण्‍यास मनाई (No Movement Outside Bubble). धार्मिक, सामाजिक, राजकिय आणि सांस्कृतिक / करमणूकीचे कार्यक्रम / मेळावे – सोमवार ते शक्रवार सभागृह / हॉल आसन क्षमतेच्‍या 50 % उपस्थितीत सायंकाळी  04.00 वाजेपर्यंत. लग्नसमारंभ – जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत. अंत्ययात्रा / अंतविधी – जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत. बैठका / निवडणूक -स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा – सभागृह / हॉल आसन क्षमतेच्‍या 50% लोकांच्‍या उपस्थितीत. बांधकाम – फक्‍त बांधकाम साईटवर निवासी / वास्‍तव्‍यास मुभा  बाहेरुन मजूर आणण्‍याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत. कृषि व कृषि पुरक सेवा – संपूर्ण आठवडाभर सायंकाळी  04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. ई कॉमर्स  वस्तू व सेवा- नियमित पूर्ण वेळ – दररोज. जमावबंदी / संचारबंदी – जमावबंदी (5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तीस एकत्र येण्‍यास मज्‍जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्‍त अत्‍यावश्‍यक कामांसाठी मुभा). व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स – दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्‍या 50% पूर्व परवानगीसह (Appointment) ए.सी.च्‍या वापरास मनाई. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) – पूर्ण आसन क्षमतेने परंतू प्रवाशांना उभ्‍याने प्रवास करण्‍यास मनाई आहे. माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह – नियमीत सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास – नियमीत सुरु राहतील. जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्‍हामार्गे प्रवास करीत असल्‍यास अशा प्रवाशांना ई पास आवश्‍यक राहील. उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह – नियमित पूर्ण वेळ –  दररोज. उत्पादक घटक १. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे  घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणारे घटक -नियमित पूर्ण वेळ – दररोज. उत्पादन  घटक – इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक यामध्ये अंर्तभूत नसणारे सर्व उत्पादन घटक – 50% स्‍टाफ चे हालचालीचे परवानगीसह  (With Transport Bubble)

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना :- अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी 05.00 वा. नंतर हालचाल / प्रवास करणेस परवानगी असणार नाही. जेंव्हा जेंव्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र  पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100% उपस्थितीसह सुरु राहतील. उपरोक्‍त ज्‍या मुद्यांमध्‍ये आसन क्षमतेचा उल्‍लेख आहे अशा सर्व आस्‍थापनांनी त्‍यांची एकूण आसन क्षमता घोषित करणारा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. अन्‍यथा ते कारवाईस पात्र ठरतील.

            अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –  रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषंगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल. शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज. विमानचलन आणि संबंधीत सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभालदुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.). किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटण, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इ. वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने. तसेच दिनांक 15 मे ते 20 मे या कालावधीतील चक्री वादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने. शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस. विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा . रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा. सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था. दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी. मालाची / वस्तुंची वाहतुक. पाणीपुरवठा विषयक सेवा. शेती संबंधीत सर्व कामकाज आणि सदर शेती विषयक कामकाज अखंडीत सुरु राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पुरक सेवा जसे की, बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज. सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात. ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत ). मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे. पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित. शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा. विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा. ATM’s. पोस्टल सेवा. बंदरे आणि त्या अनुषंगीक सेवा. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक). अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग. पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तिक व संस्थांसाठी  वस्तूचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा.

            सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना  – केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानीक प्राधिकरणे व संस्था.  सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये. विमा आणि मेडीक्लेम कार्यालये. औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. रिर्झव्ह बॅक ऑफ इंडिया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार. सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे. सर्व मायक्रो फायनान्स संस्था. मा. न्यायालय, मा. लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असलेस त्यांचेशी संबंधित सर्व अधिवक्ता / वकिल यांची  कार्यालये सुरु राहतील.

            उपरोक्त प्रमाणे सुट देण्यात आलेल्या बाबी / आस्थापना / नागरिक यांनी शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले कोविड- वर्तनुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती / आस्थापना / घटक या कोविड-19 वर्तनुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत, त्या यापूर्वी निर्गमित करणेत आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील. तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आलेस कोविड-  विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद करणेत येईल.

            उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा