पर्यटनात व्यवसायाची संधी – डी के सावंत
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना पर्यटन व्यवसाय संधी देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जागतिक पर्यटन दिन २०२० व पर्यटन व्यवसायाची संधी या विषयावर एक दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन रवीवार दि. 27 सप्टेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती डि के सावंत त्यांनी दिली.
शेजारील गोवा राज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पर्यटनासाठी वाव आहे. मात्र योग्य ती संधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश होतकरू तरुण दिशाहीन व बेरोजगार आहेत. अशा इच्छुक व होतकरू तरुणांना पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय वा नोकरी करून जिल्ह्यात वाढत असणारी बेरोजगारी कमी करता येऊ शकते, तसेच जिल्ह्यातील पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव मिळू शकतो. जिल्ह्यात पर्यटनात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत व कशा प्रकारे पर्यटन व्यवसाय करू शकतात. या संदर्भात मार्गदर्शन, प्रशिक्षण, व्यवसाय/नोकरी यासाठी डी के टुरीझमच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या होतकरू तरुणांनी अधिक माहितीसाठी डि. के. सावंत, मो. 9869002665 यांच्याशी संपर्क साधावा.