सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 76 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 36 पूर्णांक 77 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 781.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 76(853), सावंतवाडी – 50.20(907.5), वेंगुर्ला – 14.2(616.6), कुडाळ – 44(679), मालवण – 03(766), कणकवली – 34(873), देवगड – 10(720), वैभववाडी – 63(834), असा पाऊस झाला आहे.