You are currently viewing फुटवेअर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी! –  फुटवेअर संघटना जिल्हाध्यक्ष सुजित जाधव

फुटवेअर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी! – फुटवेअर संघटना जिल्हाध्यक्ष सुजित जाधव

कणकवली :

पावसाळ्यात  शेतकरी, बांधकाम कामगार तसेच जनतेला पावसाळी गम बूट, सेफ्टी बूट, प्लास्टिक चप्पलची आवश्यकता भासत आहे. सध्या कोरोना काळात फुटवेअर दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतकरी, बांधकाम कामगार यांना गरज असून सुद्धा पुरवठा करता येत नाही. तरी पावसाळी गम बूट, सेफ्टी बूट, प्लास्टिक चप्पल याची विक्री करण्यासाठी तसेच प्लास्टिक कागद, छत्री यांना ज्या प्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. तशी अत्यावश्यक सेवा म्हणून सदर दुकांनेही सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा फुटवेअरचे अध्यक्ष सुजित जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा