*मनसेचा दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास शेती करण्याचा इशारा*
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस जोरदार सुरू आहे. तौक्ते वादळा पासून आलेला पाऊस कमी झालाच नाही. त्यातच मान्सूनची भर पडल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. गेले वर्षभर कुडाळ येथील नवीन एस टी बसस्थानकाचे काम सुरू होते, बसस्थानक सुरू झाले, गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, परंतु काम अपुरे राहिल्यामुळे व बसस्थानक परिसर खड्डेयुक्त असल्याने सुरू असलेल्या पावसात चिखलमय झाला आहे.
काम अपुरे असल्याने बसस्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असूनही एस टी प्रशासनाचे त्याकडे अजिबात लक्ष नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे मनसे आक्रमक झाली असून येत्या दहा दिवसांच्या आत एस टी प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाही त्या चिखलात महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना भात पेरणी व भात लावणी करणार आहे, असा इशारा कुडाळ एस टी प्रशासनास दिला आहे.