You are currently viewing महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांनी आंबोली चेकपोस्ट घटनेची घेतली गंभीर दखल

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांनी आंबोली चेकपोस्ट घटनेची घेतली गंभीर दखल

बांदा
आंबोली चेकपोस्टवर कोरोना नाईट ड्युटी बजावताना शिक्षक श्री. चाळुचे सर जखमी झाले. या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत शिक्षक समिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष सतीश राऊळ, जिल्हा कार्याध्यक्ष व शिक्षक नेते  नारायण नाईक, तालुका कार्याध्यक्ष  प्रकाश आव्हाड यांनी सावंतवाडी चे तहसिलदार राजाराम म्हात्रे  यांचेशी प्रत्यक्ष तहसिल कार्यालय येथे भेटून चर्चा केली. कोविड१९ च्या प्राथमिक शिक्षकांच्या संपूर्ण तालुक्यातील ड्युट्या संदर्भात शिक्षक नेते नारायण नाईक यांनी शिक्षकांच्या व्यथा अत्यंत तीव्रपणे प्रशासनापुढे मांडल्या .

प्रशासनाला नाईट ड्युटी रद्द करण्याची वारंवार विनंती करुनही संघटनेच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्या संदर्भाने तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी अर्धा तास चर्चा करण्यात आली. त्यावर श्री. तहसिलदार यांनी ताबडतोब संबंधित लिपिक श्रीम. सावंत यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. त्यावेळी समिती शिष्टमंडळासमोरच तात्काळ आंबोली चेकपोस्टवरील रात्रीची ड्युटी ( रात्री ११ते सकाळी ७ ) प्राथमिक शिक्षकांची रद्द करुन इतर कार्यालयीन कर्मचारी यांची ड्यूटी लावावी असे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे आज दि. १७ जून पासून कुणीही आंबोली चेकपोस्टवर रात्रीच्या ड्युटीवर जाणार नाही, असे  तहसिलदार यांना सांगितले.

त्यावर तहसिलदार यांनी आजपासून आंबोली चेकपोस्ट वर प्राथमिक शिक्षकांनी ड्युटीसाठी जाऊ नये, असे संघटनेला सांगितले. यानंतर मळगाव रेल्वे स्टेशन येथील ड्युट्या संदर्भात चर्चा केली. यावेळी  नारायण नाईक यांनी आठवड्यात एकदाच एकच रात्रीची रेल्वे येते मग तेथे ७ दिवस शिक्षकांची ड्युटी का असा सवालच उपस्थित केला. त्यावर मा. तहसिलदार यांनी संबंधित लिपिक श्रीम. सावंत यांना या विषयी खात्री करुन गरज नसेल तर रात्रीच्या ड्युट्या तात्काळ रद्द कराव्यात असे आदेश दिले. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने शिक्षकांच्या सर्वच ड्युट्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा