You are currently viewing १८ जून ला शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या COVID रुग्णालयाच ऑनलाइन लोकार्पण

१८ जून ला शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या COVID रुग्णालयाच ऑनलाइन लोकार्पण

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कोकण म्हाडांतर्गत सुरू होणाऱ्या विशेष COVID रुग्णालयाच काम अंतिम टप्प्यात आलय. या रुग्णालयच्या लोकार्पणाची तारीख जाहीर करण्यात आलीय. खासदार शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिलीय.

ओरोस जिल्हा समादेशक इमारत येथे शुक्रवारी १८ जूनला संध्या. ठिक ४.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गृह निर्माण मंञी जितेंद्र आव्हाड, तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमाला खा. विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा