You are currently viewing दोडामार्ग पं. स. उपसभापती पदी सुनंदा धर्णे यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग पं. स. उपसभापती पदी सुनंदा धर्णे यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग :

दोडामार्ग पंचायत समितीच्या उपसभापती पदी सुनंदा धर्णे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान विद्यमान उपसभापती धनश्री गवस यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.आज या पदासाठी निवडणूक प्रकिया पार पडली. यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी,सभापती संजना कोरगांवकर,माजी उपसभापती धनश्री गवस, सेना उपजिल्हा प्रमुख गणेशप्रसाद गवस तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपसभापती सुनंदा धर्णे यांचे अभिनंदन केले.

यावेळी उपसभापती पदी एकच अर्ज आल्यामुळे दोडामार्ग प. स. उपसभापती पदी सुनंदा धर्णे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, तसेच निवडणूक विभागाचे श्री कुबल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 1 =