You are currently viewing पं.स. उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते सोनाळी लसीकरण केंद्राचा शुभारंभ…

पं.स. उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते सोनाळी लसीकरण केंद्राचा शुभारंभ…

वैभववाडी

सोनाळी येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते पार पडला. गावातील ग्रामपंचायत कार्यालयात हे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. लसीकरण केंद्र सुरू झाल्याने याचा फायदा सोनाळीसह कुंभवडे येथील ग्रामस्थांना होणार आहे.

शुभारंभ प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंद चव्हाण, सोनाळी सरपंच भिमराव भोसले, प्रमोद सावंत, राजेंद्र रावराणे, ग्रामसेवक गजानन कोलते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा