मळेवाड येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांना मनसेच्या वतीने अंडी वाटप…

मळेवाड येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांना मनसेच्या वतीने अंडी वाटप…

सावंतवाडी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांना अंडी वाटप करण्यात आली. यावेळी सरपंच हेमंत मराठे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावेळी गाव कृषि मित्र अमित नाईक,मनसे जिल्हा अध्यक्ष धीरज परब, परिवाहन सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरूदास गवंडे, मळेवाड मतदारसंघ विभाग अध्यक्ष मंदार नाईक आदी उपस्थित होते.
मळेवाड जकातनाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर १ मध्ये ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी गाव विलगिकरण कक्ष सुरू केला आहे.सर्व सोयींनी युक्त असा हा कक्ष असल्याने दाखल रूग्णांना चांगली सेवा मिळत आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कक्षातील रूग्णांना मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडुन अंडी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा