महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली.
खालील विषयावर चर्चा करण्यात आली
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्तावाबाबत
यावेळी संबंधित ३१ मार्च २०२१ पर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव ३० जून २०२१पर्यंत मंजूर करण्यात येतील. असे आश्वासन देण्यात आले.
डिसिपीएस हिशोब तक्ते तफावत व २००५पूर्वीच्या शिक्षकांच्या डिसिपीएस कपात झालेल्या रक्कमा व ६व्या वेतन आयोगाचे १ ते ४ हप्ते भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करण्या बाबत आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत २/०२/२०२१ रोजी झालेल्या झूम मीटिंगमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ३० एप्रिल पर्यंत संबंधित शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये संबंधित रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.परंतु त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही त्याबद्दल संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली त्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी संबंधित विषयाची फाईल लेखाधिकारी यांच्याकडे पाठवली असून ती ३० जून पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
आपत्कालीन व्यवस्थापनात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना लेखी आदेश मिळणे बाबत
ग्राम विलगीकरण केंद्रामध्ये कक्ष व्यवस्थापन ड्युटी साठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येऊ नयेत व १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शिक्षकांना आपत्कालीन व्यवस्थापनातून कार्यमुक्त करावे* अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी त्याबाबत चर्चा करतो असे आश्वासन दिले.
वस्तीशाळा शिक्षकांना शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेण्याबाबत
माध्यमिक विभागाकडून प्राथमिक विभागाकडे वर्ग झालेल्या शिक्षकांच्या पीएफ खात्याबाबत.व संबंधित शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता प्राप्त झालेला नाही
२ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीत नियमित वेतनावर आलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगातील विषमता दूर करणे बाबत
परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगात थकबाकी चा तिसरा हप्ता एक जुलै २०२१ रोजी रोखीने देण्याबाबत
शाळा स्तरावरील महत्त्वाची परिपत्रके दप्तरी ठेवण्यासाठी शाळांना लेखी देण्यात यावीत तसेच महत्वाची शालेय स्टेशनरी शाळांना पुरविण्यात यावी
शून्य पटसंख्येअभावी बंद झालेल्या शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत
समग्र शिक्षा अभियानामार्फत
करण्यात आलेल्या शाळा दुरुस्तीचा दुसरा हप्ता न मिळाल्या बाबत शाळांना द्यावयाच्या सन २० -२१ मधील सुट्ट्या बाबत
शिक्षकांना अर्जित रजा मंजुरीचे आदेश मिळणे बाबत
गेली अनेक वर्ष शिक्षकांना अर्जित रजा मंजुरीचे आदेश मिळत नाहीत याबाबत संघटनेच्यावतीने खंत व्यक्त करण्यात आली ते आदेश गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मिळावेत अशा प्रकारची विनंती यावेळी करण्यात आली
यावेळी संजय कोळी यांचे मेडिकल बिल, नेहा नितीन गव्हाणकर यांच्या डी सी पी एस हप्ता कपात रकमेबाबत व पंकज तांबोरे यांच्या स्थायी आदेशातील दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, कणकवली तालुका अध्यक्ष दशरथ शिंगारे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल, जिल्हा प्रतिनिधी लहू पाटील व कणकवली तालुका संघटक संजय कोळी व शिक्षण विभागातील माननीय अधीक्षक विनायक पिंगुळकर, लक्ष्मण डोईफोडे लिपिक संदीप जाधव उपस्थित होते .