You are currently viewing उद्या १४ पासून वेंगुर्ले एसटी आगारातून जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या २६ फेऱ्या

उद्या १४ पासून वेंगुर्ले एसटी आगारातून जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या २६ फेऱ्या

उद्या सोमवार १४ जून पासून  वेंगुर्ले एसटी आगारातून तालुक्यातून जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या २६ फेऱ्या सुरू होत आहेत. प्रवाशांनी नियमांचे पालन करून प्रवास करावा असे आवाहन वेंगुर्ले एसटी आगार प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

*वेंगुर्ले मधून उद्यापासून सुरू होणाऱ्या फेऱ्यांमध्ये* 

 

 वेंगुर्ला-कणकवली – सकाळी ८.१५ जाणारी तर सायं.४.३० येणारी, वेंगुर्ला – अक्कलकोट – सकाळी ७.०० – जाणारी तर सकाळी ५.०० येणारी, वेंगुर्ला – रत्नागिरी – सकाळी ६.३० – जाणारी तर दुपारी २.०० येणारी, वेंगुर्ला – कोल्हापूर – दुपारी १.१५ – जाणारी तर सकाळी ७.०० येणारी, वेंगुर्ला- सावंतवाडी – जाणाऱ्या ८.३०/१.३०/५.०० वाजता तर येणाऱ्या ९.४५/२.४५/६.३० वाजता, वेंगुर्ला – कुडाळ- जाणारी फेरी ७.४५/१.४०/४.३०- तर येणारी फेरी ९.००/३.१५/६.००, वेंगुर्ला- मालवण – जाणारी ९.१५ तर ११.३० येणारी फेरी आणि वेंगुर्ला – रेडी कनयाळ – जाणारी ७.००/२.०० तर येणारी ८.१५/३.१५ अशा एसटी गाड्यांचे वेळापत्रक आहे, असे श्री. वारंग यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा