You are currently viewing पावशी येथे सर्विस रस्ता मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला; प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पावशी येथे सर्विस रस्ता मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला; प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पोलिसांकडून आंदोलनाला अटकाव

कुडाळ

पावशी येथे सर्विस रस्ता मिळावा आणि बस शेडचे बांधकाम तात्काळ करावे या मागणीसाठी पावशी ग्रामस्थांनी आज सकाळी मुंबई-गोवा महामार्ग रोखला. यावेळी “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली” करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अखेर त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन आंदोलकांना बाजूला केले.
या आंदोलनात
पावशी येथील बावस्करवाडी, खोतवाडी, भटवाडी, मेस्त्रीवाडी भोगटेवाडी येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. कामानिमित्त जाण्याकरिता थेट महामार्गावरून जावे लागते. मुलांना शाळा कॉलेजला जाण्याकरिता बस थांबा करिता महामार्गावर पावसात उभे राहावे लागते. त्यामुळे महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे कधीही अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. या परिस्थितीमुळे ग्रामस्थ सध्या जीव मुठीत घेऊन महामार्गावर ये-जा करीत आहेत. त्यामुळे सर्विस रोड ची गरज आहे, अशी यावेळी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली ग्रामपंचायत सदस्य मिलिंद खोत, शेखर पोखरे, दीपक पावसकर, शंकर पावसकर, अरुण धुरी, पंकज खोत, शेखर महेश मेस्त्री, दिव्या खोत, सूरज पावसकर, नागेश खोत, प्रकाश पावसकर, रुपेश खोत, सुयोग मेस्त्री ,सागर भोगटे आणि सर्व पावशी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा