दोडामार्ग :
अनेक समाज कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोडामार्ग शिक्षक भारती संघटनेने १२ जून रोजी दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी, तळकट व मोरगांव या आरोग्यकेंद्रात प्रत्येकी ५ इमर्जन्सी आक्सीजन सिलेंडर तसेच साटेली – भेडशी आरोग्य केंद्रात २०० हॅन्डग्लोव्हजचे वाटप करण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागातील जास्तीत जास्त रूग्णांची तपासणी साटेली-भेडशी, तळकट व मोरगांव या आरोग्यकेंद्रात केली जाते. कोरोना कालावधीत या भागांत बरेच रुग्ण कोरोना पॅाजिटिव्ह आले आहेत. यातील काही रूग्णांना आक्सीजन लेव्हल कमी असल्याने तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यापूर्वी प्राथमिक उपचारांसाठी आक्सिजन सिलेंडरची गरज असल्याची दोडामार्ग शिक्षक भारती संघटनेच्या निदर्शनास आले. या संघटनेने सामाजिक बंधिलकी जोपासताना लगेच तिन्ही आरोग्य केंद्रात प्रत्येकी ५ इमर्जन्सी आक्सीजन सिलेंडरचे तसेच साटेली-भेडशी आरॊग्यकेंद्रात २०० हॅन्डग्लोव्हचे वाटप करण्यात आले.
मोरगांव आरोग्यकेंद्रातील इमर्जन्सी आक्सीजन सिलेंडर वाटप कार्यक्रम शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष श्री दयानंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी दोडामार्ग शिक्षक भारती तालुकाध्यक्ष श्री.मणिपाल राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष श्री.जीवन कडू, केंद्र संघटक श्री.प्रभाकर राठोड, श्री.मोहन देशमुख उपस्थित होते.
तळकट आरोग्य केंद्रातील इमर्जन्सी आक्सीजन सिलेंडर वाटप कार्यक्रम शिक्षक भारती जिल्हा सरचिटणीस श्री. अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली व श्री. दत्तप्रसाद देसाई, प्रमोद कुडास्कर, यशवंत गवस या शिलेदारांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच साटेली–भेडशी आरोग्य केंद्रातील इमर्जन्सी आक्सीजन सिलेंडर व २०० हॅन्डग्लोव्हज वाटप कार्यक्रम दोडामार्ग शिक्षक भारती तालुका सचिव श्री. सखाराम झोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री. निलेश सावंत, श्री. प्रशांत निंबाळकर, श्री. अर्जुन माळी, श्री. हरिदास राठोड, श्री.मनोज गावडेतसेच महिला प्रतिनिधी श्रीम. शिल्पा कर्पे मॅडम, श्रीम. गस्ते मॅडम हे सर्व शिलेदार उपस्थित होते.