वेंगुर्ला :
भाजपा सिंधुदुर्ग माजी आमदार श्री राजन तेली साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिटणीस माजी सभापती श्री निलेश सामंत यांच्या सौजन्याने तोक्ते वादळामुळे परुळे पंचक्रोशीत जे नुकसान झाले. त्या परिसरातील भोगवे शेळपी व किल्लेनिवती येथील नुकसान ग्रस्त गरीब कुटुंबाना आधार म्हणून ताडपत्री पत्रे/ रोख रक्कम पाण्याची टाकी, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली साहेब, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, माजी चेअरमन प्रकाश राणे, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष करलकर, आपि कोळंबकर, बूथ प्रमुख सिद्धेश वायंगणकर, आपि मालंडकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.