You are currently viewing सावंतवाडी ते कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बसफेऱ्या उद्यापासून सुरू…

सावंतवाडी ते कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बसफेऱ्या उद्यापासून सुरू…

वैभव पडोळे; कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा…

सावंतवाडी

येथील आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर, रत्नागिरी व दापोली या बस फेऱ्या उद्यापासून सुरू होणार आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी दिली. दरम्यान कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.पडोळे यांनी यावेळी केले.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित बस फेऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या होत्या.दरम्यान त्या उद्यापासून सुरू होणार आहेत. यात सावंतवाडी ते कोल्हापूर ही बस स. ०८:९०, दु.०१:४५ आणि दु.०२ :४५ या वेळेत सुटणार आहे.सावंतवाडी ते रत्नागिरी ही बस स.०७:३० आणि दु.०२:३० यावेळेत,तर सावंतवाडी ते दापोली ही बस स. ०८:०० या वेळेत सुटणाऱ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा