न्हावेली
ग्रामपंचायत न्हावेली च्या विलगीकरण कक्षाचा जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. गावागावात संख्या वाढत असल्याने सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्व जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की जिल्ह्यात ठीक ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे त्या त्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना गाव पातळीवर कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी गाव विलगीकरण कक्ष सुरु करा असे आदेश देण्यात आले.
ग्रामपंचायत न्हावेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर चार मध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. या कक्षाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त करत असताना गावागावात असे कक्ष उभारण्यास व यातील सोयी सुविधा वाढवण्यासाठी दात्यांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा सर्वांनी मिळून कोरोनाशी लढलो तर विजय नक्कीच आहे.
या कशाच्या उभारणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राणे, राजाराम पार्सेकर, प्रसाद गावडे, राजन कालवणकर, अरुण गावडे, राजेश नेमन, महादेव चौकेकर, नामदेव धाऊसकर, विठोबा गावडे, हरीश धाऊसकर, अभिषेक धाऊसकर, आदींनी मोलाची साथ दिली.
या कक्षाच्या शुभारंभप्रसंगी प्रसंगी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, न्हावेली सरपंच सौ प्रतिभा गावडे , उप सरपंच विठोबा गावडे, माजी सरपंच शरद धाऊसकर , ग्रामसेविका तृप्ती राणे, राजन कालवनकर , ग्रामपंचायत कर्मचारी विनायक आरोदेकर, विनायक कालवनकर आरोग्य कर्मचारी श्री आरोदेकर , खडपकर, बांदेकर, पोलीस पाटील अनंत मालवणकर , आनंद मसुरकर , प्रवीण गावडे आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य,आशा स्वयंसेविका उपस्थित होते.