केंद्र सरकारच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलासा दिला आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पालक किंवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाल्यास किंवा त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाचे विशेष किरकोळ रजा स्पेशल घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने याबाबतचा आदेश काढले आहेत. हे आदेश सर्व मंत्रालयाला पाठवलेली आदेशानुसार कर्मचारी स्वतः कोरोना बाधित झाला आणि त्याला क्वारंटाईन किंवा आयसोलेशन मध्ये राहावे लागणार असेल किंवा त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. तर त्याला 20 दिवसांचे विशेष रजा घेता येईल. हा आदेश 25 मार्च 2020 पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुविधा स्वतः पॉझिटिव्ह झाल्यास 20 दिवसांची सुट्टी
- Post published:जून 10, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments